Offers

CottonKing Announces Wardrobe Refresh Sale

Pune 15 June 2024

CottonKing, the leading cotton brand of ready-made men's wear in the country, has announced a Wardrobe Refresh Sale. This offers customers a chance to purchase new and stylish cotton clothes with discounts up to ₹300 on exchanging any old garment from other brands for CottonKing apparel. CottonKing offers a wide range of party wear, semi-casual, and office wear for youngsters, including jeans and t-shirts, all made from high-quality cotton, making it the brand with the most extensive range of men's ready-made cotton wear in the country.

The company's director, Koushik Marathe, stated that while customers may desire new clothes, they also need to manage what to do with their old clothes. This offer not only provides an opportunity for customers to purchase fashionable clothes but also allows them to donate their old clothes for social causes. Thus, this initiative aims to meet multiple objectives. Moreover, in today's fast fashion era, there is increasing concern about landfilling. However, we shall segregate the old cloths received and donate the usable ones to the NGO which will be given to the needy and the rest of the cloths shall be recycled and used in other applications. Since the old clothes purchased from CottonKing are made of 100% cotton, it indirectly contributes to environmental conservation.

The Refresh Your Wardrobe offer by CottonKing is valid in all their stores till 30th June 2024. Approximately four years ago, a similar Refresh Your Wardrobe offer by CottonKing received an overwhelming response from customers. Marathe expressed confidence that this offer will again receive a positive response from customers.

Terms & Conditions

‘कॉटनकिंग’तर्फे रिफ्रेश यूअर वॉर्डरोब ऑफर

जुन्या कपड्यांच्या बदल्यात प्रत्येक नव्या कपड्यांवर डिस्काउंट पुणे १५ जून २०२४

प्यूअर कॉटनच्या रेडीमेड मेन्सवेअरबाबत देशातील आघाडीचा कंपड्यांचा ब्रँड असलेल्या ‘कॉटनकिंग’ने मान्सूननिमित्त रिफ्रेश यूअर वॉर्डरोब ऑफरची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना नव्या फॅशनचे, दर्जेदार कपडे खरेदी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

या ऑफरअंतर्गत ग्राहकाला कोणत्याही ब्रँडच्या मेन्सवेअरच्या प्रत्येक जुन्या कपड्याच्या बदल्यात कॉटनकिंगकडून तीनशे रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळणार असून, एका कपड्याच्या खरेदीवर एकाच कूपनचा लाभ घेता येईल. ग्राहकांना कॉटनकिंगमध्ये पार्टी वेअर, सेमी कॅज्यूअल, ऑफिसवेअर कपड्यांच्या रेंजबरोबर तरुणांसाठी जीन्स व टीशर्टही आहेत. कॉटनकिंगची विशेषता म्हणजे शंभर टक्के कॉटनचे कपडे असून, देशात कॉटनमध्ये मेन्स वेअर रेडीमेडमध्ये सर्वाधिक रेंज उपलब्ध असणारा ब्रँड आहे.

रिफ्रेश यूअर वॉर्डरोबबाबत कंपनीचे संचालक कौशिक मराठे म्हणाले, की नवे कपडे घ्यायचे असतात; मात्र जुन्या कपड्यांचे काय करायचे, असा प्रश्न असतो. त्यामुळेच ग्राहकांना नव्या फॅशनचे कपडे खरेदी करण्याची संधी यातून मिळेल. तसेच, ग्राहकांनी दिलेले वापरातील जुने कपडे आम्ही सामाजिक संस्थेला देणार आहोत. यामुळे ते गरजूंपर्यंत पोचतील. तसेच, आज फास्ट फॅशनमुळे लँडफिलिंगचे प्रमाण वाढत आहे. मात्र, आम्ही टाकाऊ असलेल्या कपड्यांचे रिसायकलिंग करणार आहोत. तसेच, एक्स्चेंजमध्ये ग्राहक खरेदी करीत असलेले कपडे कॉटनचे असल्याने निसर्गाचेही अप्रत्यक्षपणे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. रिफ्रेश यूअर वॉर्डरोब ऑफर कॉटनकिंगच्या सर्व स्टोअरमध्ये ३० जून२०२४ पर्यंत सुरू आहे.

कॉटनकिंगने सुमारेच चार वर्षांपूर्वी रिफ्रेश यूअर वॉर्डरोब ऑफर जाहीर केली होती आणि त्यास ग्राहकांना भरपूर प्रतिसाद दिला होता. त्यावेळेस गोळा झालेल्या जुन्या कपड्यांचे वाटप पूरग्रस्तांना केले होते. याही वेळेस या ऑफरला भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला.

अटी आणि शर्थी